जपान, फेब्रुवारी 12 -- Viral News : काही दिवसांपूर्वी चीनमधील एक कंपनी चर्चेत आली होती. या कंपनीने तब्बल ७० कोटी रुपयांचा अनोखा बोनस कर्मचाऱ्यांना दिला होता. या कंपनीची जगभरात चर्चा होत असतांना आता जपान मधील एका कंपनीची चर्चा आहे. या कंपनीने नव्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट ऑफर दिली आहे. कंपनीच्या या ऑफरची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. मात्र, जपान मधील एका कंपनीने या साठी आणखी चार पावले पुढे टाकलेली दिसते. ही कंपनी ऑफिसमधील लोकांना मोफत दारू पुरवते. इतकंच नाही तर जास्त दारू पिऊन कर्मचाऱ्याला हँगओव्हर झाल्यास पगारी रजा घेण्याची सुविधाही या कंपनीने दिली आहे. जपानमधील ओसाका येथील ही टेक कंपनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक...