Mumbai, जानेवारी 31 -- Chembur Metro construction collapses : चेंबूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी मेट्रोचे बांधकाम सुरु असताना अर्धवट बांधकामाचा मोठा भाग हा शेजारी असलेल्या रहिवासी सोसायटीवर कोसळला आहे. लोखंडी सळयांचा मोठा सांगाडा या इमारतीवर कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. मात्र, सोसायटीचे काही नुकसान झाले आहे. ही घटना सायन ट्रॉम्ब रोडच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर घडली आहे. सध्या कोसळलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

चेंबुर येथे वडाळा येथे जाणाऱ्या मेट्रोचे काम सुरू आहे. हे काम करतांना लोखंडी सळया असलेल्या मोठा सांगाडा उभारण्याचे काम सुरू होते. मात्र, याला कोणताही आधार देण्यात आलेला नव्हता. हा सळ्याचा टॉवर थेट चेंबूरमधील सुमन नग...