New delhi, फेब्रुवारी 4 -- चिनी कंपन्यांचा हेराफेरी आणि ग्राहकांच्या फसवणुकीशी फार जुना संबंध राहिला आहे. सोशल मीडियावर चिनी कंपन्यांशी संबंधित अनेक मजेशीर मीम्स तुम्ही पाहिले असतील. आता अमेरिकेतील एका व्यक्तीने याचे जिवंत उदाहरण नुकतेच अनुभवले आहे. अमेरिकेतील जॉर्जिया येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला त्याने मागवलेल्या मालाच्या बदल्यात ऑर्डर केलेल्या त्या वस्तूंचे छापील छायाचित्र देण्यात आले. पार्सल उघडताच त्या व्यक्तीला धक्काच बसला.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ६८ वर्षीय सिल्वेस्टर फ्रँकलिन यांनी नोव्हेंबरमध्ये चिनी ऑनलाइन मार्केट प्लेस अली एक्सप्रेसमधून (AliExpress) प्रेशर वॉशर असलेले ड्रिल मशीन सुमारे ४० डॉलरमध्ये खरेदी केले होते. त्या माणसाला वाटलं की कमी पैशात आपल्याला चांगली वस्तू मिळाली . मात्र, वस्तू हातात पडताच त्य...