New delhi, फेब्रुवारी 5 -- किक चित्रपटातील 'मौत को छूकर टक से वापस' हा प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला माहीत असेलच, पण खऱ्या आयुष्यात चार वेळा मृत्यूवर मात केल्याचा दावा जर कोणी करत असेल तर तुम्ही काय म्हणाल? जगात अनेक जण मृत्यू जवळून पाहण्याचा दावा करतात, पण अमेरिकेच्या ६२ वर्षीय शेरॉन मिलिमनची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही! तिचा दावा ऐकून अंगावर काटे येतील. ती म्हणते की तिने चार वेळा मृत्यूचा सामना केला, आत्मा स्वर्गात गेला आणि प्रत्येक वेळी ती तिच्या खऱ्या आयुष्यात परतली.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, शेरॉन वयाच्या १३ व्या वर्षी आपल्या आईसोबत समुद्रात पोहत असताना अचानक लाटांमध्ये ती अडकली. पाण्यात बुडत असताना तिचा आत्मा शरीराबाहेर गेल्याचे तिला जाणवले. पण नशिबाने तिला दुसरी संधी दिली, तटरक्षक दलाने तिला वाचवले आणि आत्म...