Pune, फेब्रुवारी 3 -- मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. लग्नाची मागणी घातली म्हणून संतापलेल्या मुलीच्या बापाने व नातेवाईकांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. हा भयंकर प्रकार पुण्यात घडला आहे. मुलीला लग्नाची मागणी घालणाऱ्या तरुणाचा चार जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. ही घटना गोखलेनगर भागातील शहीद तुकाराम ओंबाळे मैदानात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे तर दोन जण फरार आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिलीप यल्लपा अलकुंटे (वय४५,रा. जनता वसाहत) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रामजी निलू राठोड (वय५०),अनुसया रामजी राठोड (वय४५),करण रामजी राठोड (वय१९) अशी आरोपींची...