Mumbai, नोव्हेंबर 30 -- Ajit Pawar News: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जवळपास चित्र स्पष्ट झाले असून येत्या ५ डिसेंबरला महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. याच पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्याचा नवा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल आणि उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार? यावर भाष्य केले.

भाजपसह महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युतीने घवघवीत यश मिळवले. भाजप १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी ४१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, पुढील मुख्यमंत्र्याबाबत अद्याप परिस्थ...