भारत, मे 16 -- 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत माधवीचा अपघात झाल्यापासून सागर कोळीच्या आयुष्यात मोठे वादळ आले आहे. मुक्ताचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असताना सागरच्या डोक्यावर मोठे वादळ आले आहे. माधवीचा अपघात आदित्याने केल्याचे कळाले तर काय होणार? असा प्रश्न त्याला सतावत आहे. एक बाप म्हणून जबाबदारी पार पाडत असताना बायकोशी खोटे वागावे लागत असल्याचे राग सतत सागरच्या मनात येत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मिहिरला एका माधवीचा अपघात ज्या गाडीने केला त्याबाबत माहिती मिळते. मुक्ता ही माहिती तातडीने सागरला सांगते. एक गॅरेजवाला असतो. त्याच्याकडे ही गाडी रिपेअरसाठी आलेली असते. त्यामुळे मिहिर त्या गाडीविषयी माहिती गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीक...