Mumbai, मार्च 20 -- Bhushan Gagrani News : निवडणूक आयोगानं इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी केल्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी (BMC Commissioner) ज्येष्ठ आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गगराणी हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात होते. त्यानंतर नगर विकास खात्यात ते प्रधान सचिव पदी कार्यरत होते. जुलै २०२२ मध्ये मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

गगराणी यांनी याआधी प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे. तसंच, माहिती व जनसंपर्क विभागाचे (DGIPR) महासंचालकपदही भूषवलं आहे.

कोरोना महामारीच्या काळात साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी मार्च २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारनं स्थापन केलेल्या कोविड टास...