भारत, फेब्रुवारी 10 -- १२ मार्च १९९३ रोजी मुंबई शहरात १२ ठिकाणी भीषण बॉम्बस्फोट झाले होते. यात २५७ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. यातील एक बॉम्बस्फोट वांद्रे- पश्चिमेला समुद्रकिनारी असलेल्या 'सी-रॉक' या पंचतारांकीत हॉटेलमध्ये झाला होता. स्फोटानंतर अद्याप बंद पडून असलेले हे हॉटेल ताज समूहाने नुकतेच विकत घेतले आहे. येथील २ एकर जागेवर 'ताज बॅण्डस्टॅण्ड हे ३३० खोल्या असलेल्या नवीन हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. नव्या हॉटेलचा भूमिपूजन समारंभ आज, सोमवारी पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन उपस्थित होते.

नव्या 'ताज बॅण्डस्टॅण्ड' हॉटेलममुळे मुंबई शहराची स्कायलाइन बदलणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन समारंभात सांगितलं. पूर्वी मुंबई शहर हे विविध मेळावे, परिषदा यांची राजधानी म्...