Mumbai, फेब्रुवारी 11 -- Mumbai Woman Murder : मुंबईतील वांद्रे परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका वृद्ध महिलेला बांधून तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने या महिलेची हत्या केल्याचे उघड झालं आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली आहे.

रेखा खोंडे असे हत्या करण्यात आलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या मृत वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. तर शहरीफ अली समशेर शेख (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला रिक्लेमेशन डेपो कांचन बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये वृद्ध महिलेची हत्या झाल्याचं कळलं. वांद्रे पोलिस घटनास्थळी पोहोचले. यावेळी आरोपीने रेखा खोंडे यांचे हात बांधून त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केल्...