मुंबई, एप्रिल 2 -- Siddhivinayak Temple : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर पुन्हा एकदा आपल्या ऐतिहासिक कमाईमुळे चर्चेत आले आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मंदिराचे एकूण उत्पन्न १३३ कोटींवर पोहोचले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या (२०२३-२४) तुलनेत १६ टक्क्यांनी जास्त आहे.

मंदिराच्या उत्पन्नात सर्वात मोठा वाटा भाविकांनी दिलेल्या देणग्या आणि प्रसादाचा होता. याशिवाय पूजा आणि इतर धार्मिक विधींमधून २० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. दानपेटी, ऑनलाइन पेमेंट, धार्मिक विधी, प्रसाद विक्री, सोने-चांदीचा लिलाव अशा विविध स्त्रोतांतून मंदिराला उत्पन्न मिळते. प्रसादात वापरले जाणारे लाडू आणि नारळाच्या वाडय़ांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ट्रस्टच्या अधिकाऱ्याने दिली. मंदिर प्रशासना...