Mumbai, मार्च 13 -- मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालय चालवणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींवर १५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टने यासंदर्भात सक्तवसुली संचालनालय आणि वांद्रे पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयाच्या आवारात माजी विश्वस्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काळी जादू केल्याचा दावाही ट्रस्टने केला आहे. रुग्णालयाच्या आवारात मानवी कवटीसारख्या काळ्या जादूशी संबंधित काही साहित्य सापडल्याचा दावा ट्रस्टने केला आहे.

लीलावती रुग्णालयाच्या आर्थिक नोंदींच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्टच्या कामकाजावर आणि आरोग्य सेवेवर परिणाम करणारा हा मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहत...