भारत, जुलै 3 -- मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी येथील एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षिकाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ती त्याला दारू पाजायची आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लैंगिक अत्याचार वर्षभराहून अधिक काळ सुरू होता. विद्यार्थ्याच्या वागण्यात बदल झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याने लैंगिक शोषणाविषयी उघडपणे सांगितले. मात्र, शाळा उत्तीर्ण होण्यास अवघे काही महिने शिल्लक आहेत, असे कुटुंबीयांना वाटले, म्हणून ते गप्प बसले. शिक्षिक मुलाची पाठ सोडून देतील, अशी त्यांना आशा होती, पण तसे झाले नाही.

पोलिसांनी दिलेल...