Mumbai, फेब्रुवारी 10 -- Mumbai Coastal Road: मुंबईसह राज्यातील प्रसिद्ध असलेल्या कोस्टल रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे. या मार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला असून या अपघातात एक १९ वर्षीय तरुणी ही ठार झाली आहे. तर तिचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री ८ च्या सुमारास झाला. या वाढत्या अपघातांमुळे या मार्गावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गार्गी चाटे (वय १९) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर तिचा मित्र संयम साकला हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही त्यांच्या स्विफ्ट कारने प्रभादेवी येथून मरिन ड्राईव्हला जात होते. संयम साकला हा गाडी चालवत होता. तर गार्गी ही त्याच्या शेजारी बसून होती. टयांची गाडी ही भरधाव वेगात होत...