भारत, फेब्रुवारी 6 -- Mumbai News: मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात एका व्यक्तीने चालता बोलता एका ६० वर्षीय महिलेच्या अंगावरील ८० हजार किंमतीचे सोने लुटून नेले. याप्रकरणी महिलेने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपासाला सुरुवात केली. फिर्यादी महिलेने दावा केला आहे की, एका व्यक्तीने तिला रस्ता चुकल्याचे बहाणा करत स्वत:जवळ बोलवून घेतले आणि तिच्या अंगावरील सोने लुटून पसार झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तीसोबत संवाद टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सरवाणी कुमावत (वय, ६०) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. कुमावत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या मीरा भाईंदर रेल्वे स्थानकावरून घरी जात असताना हॉटेल प्यासाजवळ एका व्यक्तीने तिला थांबवले. त्याच्यासोबत एक लहान मुलगा हो...