UP, फेब्रुवारी 15 -- यूपीच्या उन्नावमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात शोकसागरात झाले. मित्राच्या लग्नाला आलेल्या २४ वर्षीय अनुज कठेरिया या तरुणाला डीजेवर डान्स करताना हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनात हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

हसनगंज कोतवाली परिसरातील दाउदपूर येथील रहिवासी घनश्याम सिंग यांचा मुलगा अंकित याच्या लग्नाची वरात शुक्रवारी नगरपंचायत नियोतानी येथील दयानंद नगर मोहल्ला येथे राहणारे गुरु प्रसाद सिंग यांच्या घरी आली. रात्री उशिरा रिसेप्शनच्या वेळी नवरदेवाचे मित्र डीजेवर नाचत होते. त्यात फर्रुखाबादमधील हरसिंगपूर शाही गावचे रहिवासी अरविंद कुमार कठेरिया यांचा मुलगा अनुज याचाही समावेश ...