MUMBAI, एप्रिल 10 -- महाराष्ट्रात एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात एका महिलेने सासरच्या लोकांवर दाताने चावल्याचा आरोप केला आहे. मानवी दात हे धोकादायक शस्त्र मानले जाऊ शकत नाही, ज्यामुळे गंभीर नुकसान होण्याची शक्यता नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने सासरच्यांविरोधात एका महिलेने दाखल केलेला एफआयआर रद्द बातल ठरवला आहे.

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, तक्रारदाराच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात दातांच्या खुणांमुळे त्यांना किरकोळ जखम झाल्याचे दिसून आले आहे. या दुखापतीच्या आधारे महिलेने एप्रिल २०२० मध्ये एफआयआर दाखल केला.

पोलिस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, सासरच्या मंडळींशी झालेल्या भांडणादरम्यान एका नातेवाईकाने महिलेला चावल्याने ती जखमी...