मुंबई, नोव्हेंबर 13 -- Uddhav Thackeray on Raj Thackeray : राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात या मतदारसंघात उमेदवार उभा केला आहे. अमित ठाकरे विरोधात दिलेल्या उमेदवार उद्धव ठाकरे मागे घेतली अशी चर्चा होती, पण तसे झाले नाही. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझे रक्ताचे नाते महाराष्ट्रातील जनतेशी आहे. राज ठाकरेंवर हल्ला चढवत उद्धव ठाकरे म्हणाले, दरोडेखोरांशी माझा काय संबंध आहे? अशा लोकांना पाठिंबा देण्याचा मी स्वप्नातही विचारकरू शकत नाही, असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'माझं महाराष्ट्राशी रक्ताचं नातं आहे. महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे, ज्या कुटुंबाची जबाबदारी मी कोरोना काळात घेत...