New delhi, एप्रिल 8 -- जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिपलिंगचे सहसंस्थापक प्रसन्न शंकर आता मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांची पत्नी दिव्या शशिधर यांनी घटस्फोटाच्या याचिकेत त्यांच्यावर विवाह बाह्य शारीरिक संबंध, वेश्याव्यवसाय आणि 'ओपन मॅरेज'साठी दबाव यासारख्या गंभीर मुद्द्यांसह खळबळजनक आरोप केले आहेत. दिव्याचा दावा आहे की, लग्नानंतर प्रसन्ना गरोदरपणातही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत असे.

"प्रसन्ना म्हणायचा की सेक्स ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुला कितीही वेदना झाल्या तरी मला फरक पडत नाही. जर मला पटले नाही तर मी बाहेर जाऊन माझ्या गरजा पूर्ण करीन. ते फोनवर घाणेरडे फोटो दाखवून मला धमकावत असत.

सॅन फ्रान्सिस्को स्टँडर्डला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने दावा केला की, प्रसन्नाने इतर महिलांसोबत अनेकदा सेक्स के...