प्रयागराज, फेब्रुवारी 26 -- Mahashivratri Kumbh Snan: महाकुंभ २०२५ मधील सहावे आणि शेवटचे स्नान आज महाशिवरात्रीला होत आहे. यानिमित्ताने संगमावर स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने महाकुंभात दाखल होत आहेत. संपूर्ण मेळा परिसर हाय अलर्टवर ठेवण्यात आला आहे. आज त्रिवेणी संगमावर ड्रोन आणि एआय कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जात आहे. मेळा परिसरात वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. आज सुमारे दोन कोटी भाविक स्नान करतील, असा अंदाज आहे. सकाळपासून ते ७ वाजेपर्यंत सुमारे ४१ लाख लोकांनी स्नान केले होते. आतापर्यंत ६५ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात पोहोचून स्नान केले आहे. आज होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मेळा परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. वसंत पंचमी आणि माघी पौर्णिमा स्नानाच्या पूर्वीच्या दिवसांप्रमाणेच सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन व्यवस्था क...