भारत, फेब्रुवारी 6 -- सोयाबीनची सरकारी स्तरावर केली जाणारी खरेदी प्रक्रिया आज बंद होणार आहे. सरकारने सोयाबीनला ४,८९२ रुपये हमी भाव जाहीर केल्यानंतर नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात आली होती. ३१ जानेवारीपर्यंत सरकारी खरेदीची मुदत होती. परंतु अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून असल्यामुळे ही मुदत आज, ६ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. दरम्यान, सरकारी खरेदीची मुदत आणखी पुढे वाढवावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. हजारो शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन पडून असल्यामुळे त्यांच्यासाठी आणखी काही दिवस सरकारी खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा बाजार समित्यांमध्ये ३५०० ते ४ हजार रुपये क्विंटल भावात सोयाबीन विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते असं कॉंग्रेसने म्हटले आहे.

विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोय...