भारत, मार्च 10 -- अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्रातील शेतकरी आणि श्रमिक वर्गाची अत्यंत निराशा करणारा असल्याची प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली आहे . निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी आपले सरकार आले तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल व सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देऊन सोयाबीनचा दाणा न दाणा खरेदी केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. किसान सन्मान योजनेच्या अनुदानात ३ हजारांची वाढ केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. दूध व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोसळणाऱ्या दरांचा वारंवार सामना करावा लागतो. दीर्घकालीन उपाय करून दूध व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान रास्त भावाची हमी देण्यासाठी धोरणे घेतली जातील असे आश्वासनही सरकारन...