Mumbai, फेब्रुवारी 10 -- विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळत मतदारांनी थेट त्यांना बहुमतापर्यंत पोहोचवल्याने महायुतीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कमी महत्व प्राप्त झाले. बदललेल्या परिस्थितीत अजित पवारांनी मिळेल त्यात जुळवून घेत भाजपशी जवळीक साधली. मात्र पुन्हा मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे (Eknath shinde) नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांड्या मारून दरे या गावात जात आहेत. त्यातच आता भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याचे संकेत देणारी बातमीसमोर आली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून (Disaster Management Committee) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलं आहे.

चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपव...