Pune, फेब्रुवारी 7 -- Ajit Pawar Funny Comment : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि मिश्किल स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एका विधानाने गंभीर वातावरण देखील हलकं फुलकं होत असतं. दादांच्या अशाच मिश्किल स्वभावाचा अनुभव पुण्यातील पत्रकारांना गुरुवारी आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे व चाकण येथील आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी हाती ए.के. ४७ धरत, निशाणा साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या हातातील बंदूक ही थेट माध्यम प्रतिनिधींवर रोखली व मिश्किलपणे म्हणाले, महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, नाही तर उडवून टाकू. दादांच्या या विधानामुळे हशा पिकला.

धनंजय म...