Prayagraj, जानेवारी 29 -- Mahakumbh Stampede Death Toll: प्रयागराज महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची अधिकृत आकडेवारी या घटनेनंतर सुमारे २० तासांनंतर प्रशासनाने जाहीर केली आहे. या दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी २५ जणांची ओळख पटली आहे. तर ९० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ३६ जणांवर उपचार सुरू आहेत.

अनेकांचा आपल्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. कुंभ नगरचे डीआयजी वैभव कृष्णन यांनी सांगितले की, प्रचंड गर्दीमुळे बॅरिकेड तोडण्यात आले. त्यामुळेच चेंगराचेंगरी जाली व अनेक लोकांचा मृत्यू झाला .

स्नान कुठे करायचं माहीत नव्हतं! अचानक गर्दी अनियंत्रित झाली आणि.; प्रत्यक्षदर्शी भाविकानं सा...