Prayagraj, फेब्रुवारी 16 -- Mahakumbh2025 : महाकुंभ २०२५ आता संपत आला असला तरी लोकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. संगमावर स्नानासाठी लोकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी लोक तासनतास आपल्या गाडीत अडकून पडत आहेत. त्याचवेळी गाड्यांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. या सर्व गोष्टींनी त्रस्त झालेल्या चार मित्रांनी बोटीने जाण्याचा बेत आखला. या मित्रांनी बोटीने २४८ किमी प्रवास करून प्रयागराज गाठले व पवित्र संगमावर स्नान केले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहेत मित्र -इंदोरी रिपोर्टर २१ नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "महाकुंभात पोहोचण्याची प्रबळ इच्छा बघा की या तरुणांनी बोटीने २४८किलोमीटरचा प्रवास केला...