Prayagraj, जानेवारी 29 -- Mahakumbh Prayagraj : प्रयागराज महाकुंभात आतापर्यंत २० कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र गंगा स्नान केले आहे. बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी १० कोटी भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती विभागाने बुधवारी दुपारपर्यंतच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, आतापर्यंत ५.७१ कोटी लोकांनी संगमात डुबकी मारली आहे, तर २८ जानेवारीपर्यंत एकूण आकडा १९.७४ कोटी झाला आहे.

महाकुंभात मोठ्या संख्येने भाविक, नागा साधू, बाबा उपस्थित असतात. या जत्रेत दररोज लाखो भाविक येत असून दररोज येणाऱ्या भाविकांच्या संख्येची माहिती प्रशासनाकडून दिली जाते. महाकुंभात पोहोचणाऱ्या कोट्यवधी लोकांची गणना कशी केली जाते, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. काही जण रेल्वेने येतात, काही बसने किंवा अन्य मार्गाने, पण त्यानंतरही प्रशासनाला ...