Prayagraj, फेब्रुवारी 1 -- जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जाणारा महाकुंभ मेळा दीर्घकाळापासून अध्यात्म आणि भक्तीचे प्रतीक आहे. मात्र, ४५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांनी येथे येणाऱ्या पर्यटकांच्या नैतिक दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक चेंजिंग रुममध्ये एक व्यक्ती लघवी करताना पकडण्यात आला. याचा व्हिडिओ व्हाय़रल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या व्यक्तीच्या कृत्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दिव्या गंदोत्रा टंडन यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक त्या व्यक्तीला आक्रमक पद्धतीने सामोरे जाताना दिसत आहेत आणि तो वारंवार माफी मागत आहे. तो माणूस अस्वस्थ दिसत असला, तरी बहाणे देत आहे. त्यामुळे परिस्थिती अध...