भारत, जून 24 -- नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'महाराष्ट्र राज्य हवामान बदल कृती आराखडा २०३०'मध्ये हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर होणाऱ्या परिणामांबाबत काही ठोस अंदाज वर्तवण्यात आले आहेत. येत्या १५ वर्षांत ऊस, कापूस, सोयाबीन यांसारख्या प्रमुख शेतमालात २० ते ८० टक्क्यांनी घट होऊ शकते आणि प्रसिद्ध हापूस आंबा रत्नागिरीबाहेर हलवावा लागू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

ऊस हे उष्णकटिबंधीय पीक असल्याने त्याची वाढ होण्यासाठी २७ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान लागते. २०४० पर्यंत तापमानात लक्षणीय वाढ झाल्यास मराठवाड्यात ४० ते ८० टक्के आणि मध्य महाराष्ट्रात २० ते ४० टक्के उत्पादन कमी होऊ शकते. अतिवृष्टीमुळे कापसाच्या बोंडाची वाढ व परिपक्वता, बोंड निर्मिती व बोंड फुटण्याच्या अवस्थेवर परिणाम होऊन काप...