New delhi, फेब्रुवारी 3 -- एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin owaisi) यांनी लोकसभेत वक्फ कायद्यातील दुरुस्तीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सभागृहातील भाषणादरम्यान केंद्र सरकारला कडक इशारा दिला. सरकारने वक्फ कायदा सध्याच्या स्वरूपात आणला तर तो घटनेच्या कलम २५, २६ आणि १४ चे उल्लंघन ठरेल आणि देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल, असे ओवेसी म्हणाले.

हा कायदा संपूर्ण मुस्लिम समाजाने फेटाळून लावला आहे. तो पास झाला तर वक्फची कोणतीही मालमत्ता टिकणार नाही. तुम्हाला विकसित भारत घडवायचा आहे, आम्हालाही तेच हवे आहे, पण तुम्हाला हा देश ८० आणि ९० च्या दशकात घेऊन जायचा आहे. तसे झाल्यास आपण पूर्णपणे जबाबदार असाल.

Rahul Gandhi : शिर्डीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार कसे वाढले? महाराष्ट्राच्या निकाला...