Kolhapur, एप्रिल 17 -- Upsc success story :यूपीएससी नागरीसेवा (मुख्य) परीक्षा २०२३ (UPSC CSE 2023)चा अंतिम निकाल १६ एप्रिल रोजी जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ६ जणांनी यश मिळवले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर येथील वृषाली संतराम कांबळे (Vrishali kamble) हिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी व पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली. वृषाली ३१० वी रँक घेऊन आयएएस झाली आहे.

UPSC Kolhapur : बुक बाइंडरच्या मुलाचा सायकलवरून सुरू झालेला प्रवास थेट IAS पर्यंत पोहोचला, वाचा फरहानची यशोगाथा

वृषालीने आयएएस होण्यासाठी घरच्या परिस्थितीशी सामना करीत कठोर मेहनत घेत आपले स्वप्न पूर्ण केले. वृषालीने राज्यशास्तार विषय घेऊन बी.ए केले आहे. मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये तिचे पदवीचे शिक्षण झाले आहे. वृषाली मुंबईत रहा...