Mumbai, फेब्रुवारी 10 -- MamtaKulkarniMahamandaleshwar Resigned : ममता कुलकर्णी हिने होत असलेल्या विरोधानंतर किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याची घोषणा केली आहे. मी, महामंडलेश्वर, यमाई ममता नंदगिरी या पदाचा राजीनामा देत आहे. आज किन्नर आखाडा किंवा दोन आखाड्यांमध्ये माझ्याबद्दल वाद आहे, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. गेली २५ वर्षे मी साध्वी आहे आणि यापुढेही साध्वीच राहणार असल्याचे ममताने म्हटले आहे.

ममता कुलकर्णी पुढे म्हणाली, 'महामंडलेश्वरांनी मला दिलेले हे पद एक प्रकारचा सन्मान आहे. ज्यात २५ वर्षे पोहलेल्या व्यक्तीला आजपासून पोहायला येणाऱ्या मुलांना पोहण्याचे ज्ञान देण्यास सांगण्यासारखे आहे. मात्र काही लोकांसाठी हे आक्षेपार्ह ठरले.

Mahakumbh Traffic Jam V...