Mumbai, फेब्रुवारी 7 -- महाकुंभ २०२५ सतत चर्चेत असतो. यावेळी संगमात संतांसह अनेक चेहरे चर्चेत आहेत. संगमाच्या अमृत पाण्यात डुबकी मारण्यासाठी देश-विदेशातून लोक येत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या महामंडलेश्वर बनल्यामुळे चर्चेत आहे. ममतानंतर आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जात आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडची रुपेरी दुनिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अभिनेत्रीनेही अभिनय सोडून आध्यात्मिक होण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री?

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी कोणी नसून मिस वर्ल्ड टुरिझम आणि मिस इंडिया इशिका तनेजा आहे. इशिका आता सनातनी शिष्या बनली असून तिने दीक्षा घेतली आहे. द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्याकडून इशिकाने गुरुदीक्षा घेतली आहे. इशिका आता लक्...