Mumbai, फेब्रुवारी 12 -- Saamana Editorial : 'राज ठाकरे यांची मनसे आणि भारतीय जनता पक्षाची 'तन-मन-धना'ची छुपी युती आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान जणू राजकीय कॅफे आहे. तिथं भाजपचे नेते नियमित चहापानासाठी येत असतात. काही लोकांसाठी या कॅफेत राखीव जागा आहेत,' अशी जोरदार टोलेबाजी 'सामना'तून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज ठाकरे यांच्या दादर इथल्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. राज ठाकरे यांच्या चिरंजीवांना विधान परिषदेची ऑफर दिल्याचं बोललं जात आहे, तर मुंबई महापालिकेच्या रणनीतीविषयी दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सामना'नं आज 'कॅफेतल्या भेटीगाठी' या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिला आहे. त्यात या भेटीवर भाष्य करण्यात आल...