भारत, एप्रिल 18 -- पुणे: "मधुमेह व हृदयरोग यांसारख्या आजारांवर 'आयुर डायबेट' व 'आयुर कार्ड' स्वरस (ज्यूस) गुणकारी ठरेल. आयुर डायबेट स्वरसमुळे शरीरातील साखरेचे, तर आयुर कार्ड स्वरसमुळे रक्तदाबाचे व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित ठेवून हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल," असे मत आयुर्वेदाचार्य वैद्य नीरज कामठे यांनी व्यक्त केले.

सोहम सिद्धतत्वम संस्थेने निर्मिलेल्या 'आयुर डायबेट ज्यूस' व 'आयुर कार्ड ज्यूस' या दोन आयुर्वेदीय स्वरसाचे लोकार्पण बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपती बाप्पांसमोर करण्यात आले. त्यावेळी वैद्य नीरज कामठे बोलत होते. प्रसंगी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, खजिनदार महेश सूर्यवंशी, डॉ. मेघश्री कामठे, सोहम सिद्धतत्वमचे संस्थापक शुभम मुंदडा, ...