UP, मार्च 3 -- लग्न-वरात आणि वधू-वरांचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील, पण यावेळी यूपीतील प्रयागराज मधून समोर आलेल्या प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. येथे एका तरुणाने लग्न करून वधूला घरी आणले. मधुचंद्राच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी वधूला अचानक पोटात दुखू लागलं. सुरुवातीला वधूने वेदनेकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा वेदना वाढू लागल्या तेव्हा तिने सासरच्यांना याची माहिती दिली. सासरच्या मंडळींनी वधूला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तिची तपासणी करून ती गरोदर असल्याचे सांगितले. हे कळल्यावर नवऱ्याचा राग अनावर झाला. काही वेळातच वधूने मुलाला जन्म दिला. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ मुलीच्या कुटुंबीयांना बोलावून तिला मुलासह परत पाठवले.

हे संपूर्ण प्रकरण करछना परिसरातील एका गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...