New delhi, मार्च 18 -- मतदार ओळखपत्र (ईपीआयसी) आधारशी लिंक करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यावर चर्चा झाली. ही प्रक्रिया पूर्णपणे संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार असेल, असे आयोगाने स्पष्ट केले.

कायद्यानुसार असेल प्रक्रिया -

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची प्रक्रिया घटनेच्या कलम ३२६ आणि लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० च्या कलम २३ (४),२३ (५) आणि २३ (६) नुसार असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत आयोगाने म्हटले आहे की, आधार कार्ड हा केवळ ओळखीचा पुरावा आहे, नागरिकत्व नाही. त्यामुळे आधारशी लिंक करण्याच्या प्रक्रियेमुळे मतदार यादीत केवळ भारतीय नागरिकांचीच नोंदणी होणार आहे.

राज्यघटने...