Hyderabad, फेब्रुवारी 12 -- हैदराबादमधील टप्पाचबुतरा परिसरातील एका मंदिर परिसरात असलेल्या शिवलिंगाजवळ मांसाचा तुकडा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. स्थानिकांना माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोक मंदिराजवळ जमा झाले आणि त्यांनी विरोध प्रदर्शन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्थानिकांसह निदर्शने केली. लोकांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे टप्पाचबुतरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान आणि शिव मंदिराच्या आवारात ही घटना घडली. या घटनेचा तपास पोलिसांची चार पथके करत आहेत. मंदिर समितीच्या एका सदस्याने सांगितले की, शिवलिंगाजवळ कोणीतरी मांस फेकले आणि जेव्हा भाविकां...