Delhi, फेब्रुवारी 13 -- Pakistan broke ceasefire on LOC : पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली असून नियंत्रण रेषेवरील तारकुंडी भागातील भारताच्या फॉरवर्ड पोस्टवर गोळीबार केला. यामुळे सीमेवर तणाव निर्णयाम झाला असून भारतीय लष्कराने याला चोख उत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, याच भागात बुधवारी सायंकाळी भूसुरुंगावर पाय पडल्याने झालेल्या स्फोटात भारतीय लष्कराचा एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) किरकोळ जखमी झाला. जखमी अधिकाऱ्याला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात सीमेपलीकडून शत्रूच्या कारवाया वाढल्याने नियंत्रण रेषेवरील परिस्थिती तणावपूर्ण असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या वर्षातील शस्त्रसं...