Mumbai, एप्रिल 30 -- बहुतेक लोकांना अगदी कितीही संगीत प्रेमी असले तरी रुद्रवीणेबद्दल फारच कमी माहिती असते. रुद्रवीणा हे वाद्य वाजवायला अत्यंत अवघड आणि पेलायलाही अवघड असे आहे. भारतात हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच रुद्रवीणा वादक आहेत. त्यापैकी पुरुषांमध्ये रुद्रवीणा वादक जिया मोहिनुद्दीन खान डागर यांचे चिरंजीव रुद्रवीणावादक बहाउद्दिन खान डागर आणि महिलांमध्ये कर्नाटकाच्या श्रीमती ज्योती हेगडे ही दोन नावे प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात. त्यातही बहाउद्दिन खान साहेब हे अधिक प्रसिद्ध, अधिक जगप्रवास केलेले आणि अधिक लोकप्रिय असलेले रुद्रवीणा वादक आहेत. ते जरी धर्माने मुस्लिम असले तरी त्यांच्या तोंडात सतत देवी सरस्वतीचे नाव असते याचे कारण म्हणजे रुद्रवीणा हे वाद्य भगवान शंकरांनी निर्माण केले अशी समजूत आहे.

भगवान शंकर रुद्रवीणा वाजवीत तसेच लंकेचा राज...