भारत, मार्च 22 -- देशात कृषी क्षेत्रात तब्बल ६४.४ टक्के महिला कार्यरत असून कृषी आधारित उद्योगात महिलांचा वाटा केवळ ६-१० टक्केच असल्याचे एका ताज्या अहवालात म्हटले आहे. गोदरेज अॅग्रोवेट, डीईआय लॅब आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 'कृषी-आधारित उद्योगातील महिला - संधी आणि आव्हाने' या विषयावर तयार करण्यात आलेला हा सर्वे आज मुंबईत आयोजित महिला कृषी परिषदेदरम्यान प्रकाशित करण्यात आला. या अहवालात महिलांचा कृषी व्यवसायातील सहभाग, नाविन्यपूर्णता आणि समान विकासासाठी कृती योग्य उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत.

या अहवालाबाबत बोलताना गोदरेज अॅग्रोवेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव म्हणाले, 'उत्तम दर्जाचे कृषी विषयाचे शिक्षण, कामाच्या ठिकाणी सर्वसमावेशकता आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवि...