Mumbai, फेब्रुवारी 4 -- Bryan Johnson Nikhil Kamath : अँटी-एजिंग इन्फ्लुएन्सर म्हणून प्रख्यात असलेला अमेरिकी कोट्यधीश ब्रायन जॉन्सन यानं झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांच्या सोबतची मुलाखत अर्ध्यातच सोडल्याचं समोर आलं आहे. ब्रायननं 'एक्स'वर पोस्ट लिहून असं करण्यामागचं कारणही सांगितलं आहे. त्यानं भारतातील हवेच्या गुणवत्तेला दोष दिला आहे. त्याच्या या उत्तरानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

निखिल कामत हे 'डब्ल्यूटीएफ इज ' नावानं पॉडकास्ट करतात. या पॉडकास्टमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर हजेरी लावतात. दीर्घायुष्य विषयावरील एका ताज्या भागात कामत यांनी अमेरिकेचा कोट्यधीश ब्रायन जॉन्सन आणि इतर पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं. मात्र, हवेच्या गुणवत्तेमुळं हैराण झालेल्या ब्रायननं मुलाखत लवकर संपवण्याचा निर्णय घेतला. या लोकांनी तीव्र प्रतिक्रिया ...