भारत, नोव्हेंबर 25 -- भाजपच्या एका नगरसेवकाची त्यांच्याच मित्रांनी बेदम मारहाण करून हत्या केली. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर जिल्ह्यातील मुरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी या घटनेचा व्हिडीओसुद्धा शूट केला आहे. ग्वाल्हेरमध्ये वॉर्ड नंबर तीनमधून शैलेंद्र कुशवाह नगरसेवक होते. त्यांच्या हत्येनंतर कुटुंबियांसह नातेवाईकांना आंदोलन केलं. शैलेंद्र कुशवाह हे राज्यमंत्री भर सिंह कुशवाह यांचे नातेवाईक आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे निकटवर्तीय होते.

सुरुवातीच्या तपासात अशी माहिती समोर आली की, केक कापल्यानंतर पाच मित्रांनी दारु पिण्यास सुरुवात केली. दारु प्यायल्यानंतर नशेत त्यांचा शैलेंद्र कुशवाह यांच्याशी वाद झाला. त्यानंतर चौघांनी मिळून काठीने त्यांना मारहाण केली. रस्त्याच्या बाजूला बेदम मारहाण करत असत...