Mumbai, फेब्रुवारी 4 -- Rahul Solapurkar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल वादग्रस्त विधानं करणारे अभिनेता राहुल सोलापूरकर याच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी व रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात यांनी सोलापूरकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. सोलापूरकरनं महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

'शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटले ही दंतकथा आहे. त्यावेळी पेटारे वगैरे काही नव्हतं, असं राहुल सोलापूरकर एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

'हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचं व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच...