भारत, एप्रिल 17 -- पुणे : पुण्यातील आघाडीचे आणि भविष्याभिमुख रिअल इस्टेट डेव्हलपर ब्रम्हाकॉर्प लिमिटेड यांनी ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन केल्यानंतर निवासी व व्यावसायिक प्रकल्पांमध्ये ग्राहकांची वाढती मागणी अनुभवत मोठ्या प्रमाणात विक्री नोंदवली आहे.

आजकालचे गृहखरेदीदार केवळ लक्झरी व लोकेशन शोधत नाहीत, तर टिकाऊपणा, सोयीसुविधा आणि भविष्याच्या दृष्टीने तयार असलेल्या जीवनशैलीचा विचार करतात. अशा प्रकारचे विकास प्रकल्प तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेल्या तरुण ग्राहक, पर्यावरणाचा विचार करणाऱ्या कुटुंबीयांसाठी तसेच भविष्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आकर्षक ठरतात.

सरकारकडून ई-मोबिलिटीसाठी होत असलेली आक्रमक पुढाकार, वाढत्या इंधन दरासह वाढलेली पर्यावरणाबद्दल जागरूकता यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकाराला गती मिळाली आहे. त्यामु...