Ahmednagar, फेब्रुवारी 4 -- Pahilwan Baba Mandir Bodhegaon Murder : शिर्डी देवस्थान संस्थेच्या दोघांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना आता शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील एका सेवेकऱ्याची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. हे सेवेकरी गेल्या आठवड्या भरापासून बेपत्ता होते. अखेर त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांचं मुंडंक हे मंदीरा शेजारी तर धड जवळील विहिरीत सापडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवर पहिलवान बाबा मंदिर आहे. येथे गेल्या १५ वर्षांपासून सेवेकेरी म्हणून काम करणारे नामदेव दहातोंडे (वय ७०) यांची हत्या करण्यात आली आहे. नामदेव दहातोंडे हे गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या मृतदेह हा सोमवारी मंदिराशेजाच्या विहिरीत आढळला. या प्रकरणी पोलि...