Mumbai, फेब्रुवारी 12 -- हायटेक मोबाइल बाथरूमने सुसज्ज अशी एक अनोखी बस मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहे. अनेक महिलांचे जीवन सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. ही अनोखी बस मोफत आंघोळीची सुविधा देत असून विशेष म्हणजे सुरू होऊन केवळ एक महिना झाला असला तरी त्याचा वापर करणाऱ्या महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे.

मुंबईत धावणारी ही साधारण बस नाही, तर चालते फिरते लक्झरी बाथरूम आहे. बसमध्ये पाच मोबाइल फोन चार्जिंग पॉइंट, दोन कपडे ड्रायर आणि सुसज्ज आंघोळीची खोली आहे. प्रत्येक बाथरूममध्ये हँडवॉश, बॉडी वॉश, बादली, नळ, शॅम्पू, शॉवर, गीझर आणि अगदी टब देखील उपलब्ध करून दिला आहे. एवढेच नव्हे तर पाणी बचतीसाठी यात खास यंत्रणा बसवण्यात आली आहे, ज्यामुळे अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण बसचे पाणी फ्लश होते. ही बस केव...