भारत, एप्रिल 14 -- अली अब्बस जफर दिग्दर्शित 'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. प्रदर्शनापूर्वी पासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे म्हटले जात आहे. तीन दिवसात चित्रपटाने किती कमाई केली? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली होती. पहिल्या दिवशी चित्रपटाने १६ कोटी ६५ लाख रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी मात्र चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. ही कमाई केवळ ७ कोटी ६० लाखांवर आली होती. कमाईत ५५ टक्के घसरण झाली होती. त्यामुळे अनेकां...