भारत, मार्च 15 -- भारतीय परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ अधिकारी अशोक कुमार यांची बेलारुसमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक कुमार यांनी बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अशोक कुमार यांनी बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांड्र लुकाशेन्को यांची भेट घेऊन त्यांना भारताच्या राजदूतपदाची ओळखपत्रे सादर केली. अशोक कुमार हे यापूर्वी झांबियामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत होते.

'भारत हा दीर्घकाळापासून बेलारुसचा मित्र आणि भागीदार देश आहे. आम्हाला भारतासोबत धोरणात्मक संबंध स्थापित करायचे आहे', असं राष्ट्रपती अलेक्झांड्र लुकाशेन्को यांची यावेळी सांगितलं. २०२४ साली भारताच्या पाठिंब्यामुळेच बेलारूस 'शांघाई सहकार्य परिषदे'चा पूर्णवेळ सदस्य देश बनला होता. शिवाय 'ब्रिक्स' संघटनेचा भागीदार देश म...