Cuttack, मार्च 30 -- बेंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेस रविवारी रुळावरून घसरली. ओडिशातील कटक जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. एसी ट्रेनचे ११ डबे रुळावरून घसरले. एनडीआरएफचे पथक आणि रेल्वेचे अधिकारी मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ओडिशातील कटक जिल्ह्यातील नेरगुंडी स्थानकाजवळ रुळावरून घसरून झालेल्या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी झाले आहेत.

पूर्व किनारपट्टी रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितले की, एसएमव्हीटी बेंगळुरू-कामाख्या एसी एक्स्प्रेसचे ११ डबे सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी निरगुंडीजवळील मंगळुरी येथे रुळावरून घसरले. घटनास्थळी मदत गाडी रवाना करण्यात आली आहे.

काही जखमी प्रवाशांव्यतिरिक्त आम्हाला एक मृतदेह मिळाला आहे. जखमी प्रवाशांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची तीन पथके कार्यर...